गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा.
मंठा-शहरातील द्रौपदाबाई आकात प्राथमिक शाळेच्या आनंदनगरीत मंगळवारी (ता. १४) विद्यार्थ्यांनी मौजमजा केली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी मोठ्या हौसेने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल थाटले होते, त्यास पालक, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.मुख्याध्यापक बाबासाहेब ताठे,उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे, रमेश ढवळे, एस. एन. मोरे, ज्ञानेश्वर वायाळ सर, महादेव नेवरे, दिनकर निर्वळ, मुख्याध्यापिका एफ. ए. शेख आदींची प्रमुख उपस्थितीत आनंदनगरीचा प्रारंभ करण्यात आला.विद्यालयाच्या प्रांगणावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आकर्षक पद्धतीने थाटले होते. प्रत्येक खाद्यपदार्थाच्या स्टॉलला प्रमुख पाहुणे, पालक तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्याथ्र्यांनी लावलेल्या स्टॉलवर भेळ, वडापाव, सांगितले. मूगवडा, खिचडी, कचोरी, समोसा, पाणीपुरी, चणे, गुलाबजामुन, चिवडा, खडाखडी,भेल,ठेचा भाकर, चॉकलेट, यासारखे खाद्यपदार्थ तसेच मिनरल वॉटर, चहाचा समावेश होता.आनंदनगरी सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निखळ आनंद तर मिळतोच, त्याशिवाय त्यांना व्यवसायासाठी लागणारे कौशल्य व ज्ञान प्राप्त होते. आपण व्यवसायात चार पैसे कमावू शकतो याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते, असे सुनीता पवार यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका एस. एस. पवार, पी. व्ही. आवसारे, एस. यु. ताजणे आदींनी परिश्रम घेतले.
Users Today : 0