छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -गोकुळसिंग राजपूत
बिड- येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने बीड येथे आयोजित मिलेट दौड कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. बीड जिल्हा कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.* बदलत्या जीवनशैलीत नागरिकांचे आरोग्य आबादीत रहावे यासाठी मिलेट दौडच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्येचे आहारातील महत्व व फायदे बाबत जनजागृती करण्यात आली. या दौड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते. 64 वर्षीय कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची दौड मधील धाव पाहून सर्वांनाच आश्चर्यराचा धक्का बसला. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौडचा शुभारंभ झाला. राजुरी वेस , माळी वेस, सुभाष रोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्गे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणवर सांगता
झाली.जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुंडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, कारागृह अधीक्षक विलास भोईटे, कृषी विद्यापीठाच्या प्रमुख दीप्ती पाटेगावकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर ,तहसीलदार सुहास हजारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष साळवे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे तसेच जिल्ह्यातील कृषी विभागासह इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील नागरिक मिलेट दौड मध्ये सहभागी झाले होते.
Users Today : 27