थैलेसिमियाग्रस्त चिमुकल्या देवयानीला हवा मदतीचा हात. शस्त्रक्रियेसाठी 15 लाखांचा खर्च पुणे येथे उपचार हेल्प फोर देवयानी कॅम्पेन

Khozmaster
1 Min Read

चिखली:- चिखली येथील विजय जयसिंग खरे यांच्या नऊ वर्षाच्या मुलीला थैलेसिमिया मेजर या दुर्मिळ आजाराने ग्रासले असून तिला दर पंधरा दिवसांनी रक्त (ब्लड) चढवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागते. तिच्या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर

हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे येथे तिच्यावर होणाऱ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट या शस्त्रक्रियेसाठी 15 लाख रुपये खर्च येणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन देवयानीच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. चिखली येथील विजय खरे हे सामान्य परिस्थितीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात या ऑपरेशन साठी लागणारा खर्च हा त्यांच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांच्या व परभणी येथील थैलासिमिया सोसायटी लक्ष्मीकांत पिंपळगावकर सर यांच्या सल्ल्यानुसार तिला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करावयाचे आहे दरम्यान तिच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही महागडी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी 15 लाखाचा खर्च अपेक्षित आहे एक सामान्य कुटुंबातील माणूस एवढी मोठी रक्कम कुठून आणणार ? हा मोठा प्रश्न सध्या या कुटुंबासमोर आहे त्यामुळे नऊ वर्षाची देवयानी या आजाराशी झगडत असून त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येण्याची गरज आहे मदतीसाठी आपण कू.देवयानी विजय खरे हिच्या गुगल पे किंवा फोन पे नं 9250581008 तसेच एसबीआय अकाउंट नंबर चिखली शाखा 40844464704 IFCE COD SBIN0000349 यावर सढळ हाताने मदत करू शकता.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *