प्रतिनिधी :सौरभ कामडी
चेतन ठाकरे सरांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न” पुरस्कार प्रदान.
सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचा दैदिप्यमान स्नेह सोहळा भाऊसाहेब वर्तक हॉल विरार येथे अतिशय आनंदात पार पडला.या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण, ता.विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सन्मा.भक्ती शिंदे,संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेश भोईर,सचिव श्री.अंकुश भोईर,चेतन सरांचे आई – वडील,पत्नी, मुले, ताई व भाऊ,पुतणे सर्व कुटंबिय उपस्थित होते. हा सरांना तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान झाल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालय जव्हार,आदिवासी सेवा मंडळाचे पदाधिकारी,चारही आश्रमशाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,चतुर्थ कर्मचारी, विद्यार्थी,सर्व नातेवाईक तसेच सर्व क्षेत्रातून सरांचे कौतुक केले जात आहे.
Users Today : 27