पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी
मौजे. सावर्डे. तालुका मोखडा जिल्हा पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम शाळा सावर्डे पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग पट ४२ एकच शिक्षक २०१९ ते २०२३ पर्यंत कार्यरत असून सावर्डे शाळा लोकांना शंका होती की कधी डिजिटल होईल की नाही परंतु तेथील उपक्रम शिक्षक श्री संतोष बोंद्रे सर यांनी एक ध्यास घेतलं की सावर्डे शाळा डिजिटल करून आयएसओ करण्याचं निर्धार केला एकाच वर्षाच्या काळा मध्ये शाळेचा अंतरंग बाह्यरंग ,गार्डन स्वच्छ ,टॉयलेट क्रीडांगण ,विद्यार्थी गुणवत्ता वाढवताना स्मार्ट टीव्हीचा वापर केला व एका शिक्षकाची उणीव भरून काढली . विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत शाळा आयएसओ केली
या कार्यक्रम प्रसंगी माननीय प्रकाश जी निकम साहेब जि प अध्यक्ष पालघर राज्यमंत्री दर्जा. उपसभापती माननीय प्रदीप जी वाघ .माननीय सौ कुसुमताई झोळे जि प सदस्य. मा. पंचायत समिती सदस्य माननीय मिलिंद झोले मा.येले सरपंच पाचघर मा.उपसरपंच हनुमंत पादीर शाळा समिती अध्यक्ष सावर्डे .मोठ्या संख्येने सावर्डे पाचघर ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते सर्वांनी सावर्डे शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांचे सत्कार व अभिनंदन करत कोतुक केले.
Users Today : 28