श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते.
सकाळी ११ वाजता ७६ वर्षाचे के.डी. वैद्य सर दहा मिनिटे आधीच तिथे हजर झाले. अकरा वाजता दहा लोकांपासून सुरू झालेल्या हे अन्नत्याग आंदोलन समारोप होता होता शंभर एक लोकांपर्यंत जाऊन पोहोचले. दुपारच्या वेळी अनेक किसान पुत्रांनी आंदोलनाच्या स्थळाला भेट दिली .
समारोपिय कार्यक्रमांमध्ये सर्व सहभागी संघटनांच्या वतीने आपली भूमिका मांडण्यात आली. प्रमुख अतिथी वक्ते माननीय रवी दादा मानव यांनी अतिशय ओघावत्या शैलीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली .कार्यक्रम संपल्यानंतर रवी दादाच्या भोवती मोठा गोतावळा जमा झाला होता. या नंतर चुडामणी न्यूज चॅनलच्या वतीने या आंदोलनाबाबत प्रमुख काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया सुद्धा नोंदवण्यात आली.एक दिवसाच्या उपवास केल्याने शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाहीत परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे आंदोलन नक्कीच करेल. आज महाराष्ट्रभर हे आंदोलन मोठ्या उत्स्फूर्तपणे राबवल्या गेलं यामुळे इथून पुढे राज्यकर्त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कसेही वागू अशी भूमिका घेता येणार नाही. तुम्हाला जाब विचारणारे शेतकरी पुत्र प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात ठामपणे उभे राहतील असा विश्र्वास वाटतो .