पोलिस निरीक्षक संजय देशमुख साहेब यांची दबंग कामगिरी.
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा.
मंठा :तालुक्यातील टाकळखोपा येथे अवध्यर्थ गौणखनिज वाळू उत्खनन करताना मंठा पोलिसांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना त्यांचे गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, टाकळखोपा येथील काही इसम ट्रैक्टरच्या सहाय्याने मौजे टाकळखोपा शिवारातील पुर्णा नदी पात्रातुन अवैध रित्या रेती (बाळु उत्खनन करीत आहे.
अशी खात्रीलायक बातमी मिळाली या पोलीस ठाणे मंठा येथील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको रखमाजी मुंढे, पोका विलास कातकडे, पोकों पांडुरंग निंबाळकर, पोकों दिपक आढे, पोका प्रशांत काळे यांनी पुर्णा नदी पात्रात जाऊन दोन ट्रैक्टर ट्रॉली व रेती पकडून जप्त केले असून सदरचे ट्रॅक्टर हे पोलीस ठाणे मंठा येथे आणुन त्याचे विरुध्द पोलीस अंमलदार दिपक एकनाव आहे याचे फिर्याद वरून आरोपी लक्ष्मण विठोबा गायकवाड, रा. टाकळखोपा याचे विरुद्ध पोलीस ठाणे मंठा गौ. ख. कायदा प्रमाणे फिर्यादी वरून गुन्हा दाखलआलेली आहे. तसेच सदर आरोपीतांच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती एक बास सह एकुण किंमती १४,०२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे ब. अप्पर पोलीस अधिक्षक राहुल खाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोउपनि बलमीम राऊत, आसमान शिंदे व रखमाजी मुंढे, विलास कातकडे, दिपक आढे, प्रशांत काळे, श्याम गायके, पांडुरंग हागवणे, आसाराम मदने, कान्हाबाराव हाराळ, केशव चव्हाण, आनंद ढवळे, सतिष आमटे यांनी अवैध रेतीचे ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती व त्यांचे चालक व मालक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.करण्यात आलेला आहे. व पोलीस अंमलदार विलास शिवदास कातकडे याचे फिर्यादी वरुन पोलीस ठाणे मंठा येथे आरोपी नामे ज्ञानेश्वर विष्णुपंत लाड रा. टाकळखोपा ता. मंठा याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आहे.
Users Today : 8