गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा.
मंठा :तालुक्यातील लिंबोना-जाटखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत तांडा वस्ती सुधार योजनेतून सिमेंट रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून सदरील काम अंदाजपत्रका प्रमाणे करून अंदाजपत्रकाची प्रत मिळावी या करीता ओमप्रकाश उकंडे यांनी गट विकास अधिकाऱ्यास दिले निवेदन निवेदनात लिंबोना -जाटखेडा येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत लिंबोना तांडा व जाटखेडा तांडा येथे सिमेंट रस्ताचे काम चालु असुन सदरील काम हे अंदाजपत्रका प्रमाणे होत नाही. सदरील रस्त्यावर बोगस काम करून लाखो रुपये निधी काढण्यात येत आहे.
जाटखेडा येथे पुर्वीच्याच रोडवर रोड तयार करण्यात आला असुन कामासाठी लागणारी रेती ऐवजी डस्ट वापरण्यात येत आली आहे. कामाची रुंदी कमी आहे सिमेंट कमी वापरून .दबई करण्यात आली नाही, पाण्याचा वापर कमी करून काम अंदाजपत्रकात नमुद केल्याप्रमाणे मटेरीयल वापरण्यात यावे कामाची लांबी, रुंदी अंदाजपत्रकात नमुद केल्या प्रमाणे घेण्यात यावी. खडी ऐवजी विहरीचा दगड वापरण्यात येत आहे.सदरील काम अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जात्मक करण्यात यावे हीच आमची मागणी केली असता संबधीत गुत्तेदार/यंत्रणा हे ऐकत नसुन अरेरावीची भाषा वापरतात कामावर संबधीत यंत्रणेचे अधिकारी यांचे लक्ष दिसून येत नसल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.या बाबत संबधीत यंत्रेतील लोक म्हणतात की, सदरील काम हे असेच होणार असुन आम्हाला काम मंजुर करुन आणण्यास वरती १५ ते २० % रक्कम अगोदर मोजावी लागते तुम्ही कामाची पाहणी करणार कोण ? आमचे राजकिय मंडळीसह मोठे अधिकारी यांना सांभाळावे लागते परत कामावर आले तर तुमच्या विरुध्द शासकिय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करुन आणि तुम्हाला जेल मध्ये घालू त्यामुळे भविष्यात तुम्हाला नोकरी लागणार नाही आणि परत कामावर यायचे नाही अशी धमकी दिली आहे.तरी आपणास विनंती की, सदरील कामाची स्वतः तात्काळ पाहणी व चौकशी करुन जो पर्यत नियमाप्रमाणे काम पूर्ण व अंतीम होत नाही तो पर्यत कामाचे देयक अदा करू नये तसेच सदरील काम हे अंजदापत्रका प्रमाणे करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून तात्काळ देण्यात यावेतअसे म्ह्टले निवेदनावर ओमप्रकाश उकंडे यांची स्वाक्षरी आहे.