गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा : तालुक्यातील ढोकसाळ येथे रात्री आठ वाजता शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना आग लागून दुकानदाराची लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
दुकानदार आपले दुकान बंद करून घरी गेले असता आजूबाजूच्या लोकांना दुकानातून धुर येत आहे आसे समजले नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल मंठा व पोलीस स्टेशन मंठा यांच्याशी संपर्क करून माहिती दिली.ही घटना अग्निशामक दल वेळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे.यावेळी पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, तत्पर्त मदतीला धावणारा नेता किसनभाऊ मोरे… ढोकसाळ ता.मंठा येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याली समजतात घटनास्थळी जाऊन पहाणी करताना जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी जालना व पंचायत समिती सदस्य श्री.किसनराव मोरे व गावकरी मंडळी ढोकसाळ व फोन द्वारे आधिकार्यांना घटनेची सुचना केली..!!, विद्युत महावितरण चे उपअभियंता अनिल जंगम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी बोलताना अतुल बहिवाळ मनाली की माझे बहिवाळ जेल्बर्स ह्या दुकानची दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे दागिने व दुकानचे फर्निचर संपूर्ण जळून खाक झाले आहे.व शेजारी असलेले दीपक सोनुनकर यांचे पूजा हेअर सलून हेही संपूर्ण जाळून खाक झाले आहे. यामध्ये अंदाजे एक लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती सोनुनकर यांनी दिली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दुकानदारांनी दिली.