आशा डे कार्यक्रम परतूर येथे संपन्न

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकरजिल्हा प्रतिनिधी मंठा.

दिनांक 22 मार्च 2023आशा स्वयंसेविका केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः ग्रामीण पातळीवर आरोग्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका Accredited Social Health Activist म्हणून गावातील स्थानिक महिलांची नेमणूक केली. आशा स्वयंसेविकां महत्वपूर्ण आरोग्य सामाजिक दुवा म्हणून राज्यात कार्य पार पाडत असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील The National Rural Health Mission शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याची कामगिरी आशा स्वयंसेविका बजावत असतात. यांच्या चांगल्या व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर व राज्यस्तरावर सन्मान केला जातो. असा च आशा डे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परतूर अंतर्गत आशा डे ग्रामीण रुग्णालय परतूर येथे आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. बबनराव लोणीकर साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ मंदाताई बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आशा स्वयंसेविका यांची रांगोळी स्पर्धा गायन स्पर्धा व तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविका यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला या वेळी त्या बोलत होत्या.पु कोढे बोलताना सौ मंदाताई लोणीकर म्हणाल्या की आरोग्य सेवा करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करत असताना आपलेपणाची भावना रुग्णा प्रति जोपासावी आशा सेविका आरोग्याचा कणा असून आरोग्य सेवे सारखं पुण्य या जगात दुसर नसल्यामुळे आशा सेविकांना हे पुण्य कमावण्याची संधी प्राप्त झाली असल्याने राज्यातील सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नागदरवाड . DCM पुणेवाड मॅडम बरकुले मॅडम .डॉ ठाकूर सर . डॉ नवल डॉ डाके सर डॉ पांढरपोटे डॉ मोरे डॉ तारे डॉ वाघमारे श्री सोमंथा येव्हारे मदने मॅडम सर्व गटप्रववर्तक , व आशा सेविका उपस्थित होत्या.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *