रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी :गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि. 22/03/2023 रोजी कोरडे फार्म हाऊस हिंगणी बु तेथे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा श्री नरेंद्र राठोड साहेब यांच्या हस्ते वानग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हिंगणी बु च्या शासकीय हरभरा खरेदी नाफेडला सुरुवात करण्यात आली. 
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री गौरव राऊत , वानग्रीन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अमित डोबाळे ,अमित डोबाळे उपाध्यक्ष, शिवशंकर कोरडे , प्रगतशील शेतकरी सचिन कोरडे ,गोटू कोरडे, सागर कोरडे ,भास्कर खांजोड , संदीप भाऊ गांधी निवृत्ती कडू आदी मान्यवरांच्या उपस्थिती होती.शासनाने या वर्षी हरभऱ्याचे हमीभाव 5335 रुपये जाहीर केले असून इतरत्र व्यापारी 4500 रुपयांनीच हरभरा खरेदी करीत असल्याचे चित्र दिसत आहे . अशातच वानग्रीन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ने हिंगनी बुजुर्ग येथे शासकीय हरभरा खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
Users Today : 22