प्रतिनिधी अविनाश गवई
पातूर – दि. 01 ऑक्टोबर 2022 रोजी रेणुका माता देवी येथे दर्शनाकरिता भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे सायंकाळी आरतीच्या वेळेस भाविक देवकाबाई चौरे रा. घानेगाव जि. बुलढाणा वय 60 ह्या महिला रेणुका माता देवी येथे कुटुंबासोबत आले असता गर्दी मध्ये हरविल्या होत्या. कुटुंबासोबत टेकडी वरती गेल्या असता आरती संपल्या नंन्तर कुटुंबातील लोकांना अचानक आजी हरविल्या असे लक्षात आले असता क्षणाचा विलंब न करता बंदोबस्त करीत असतांना ताबडतोब महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या महिला सदस्य, तसेच सर्व पदाधिकारी यांनी सर्वीकडे शोधा शोध केली.तसेच एस. आर. पी. एफ गट नं. अमरावती यांच्या प्रयत्नातून सर्व टेकडी परिसरामध्ये पोलीस बॉईज असोसिएशने सदस्यांनी सर्व टेकडी परिसर, नाईक विद्यालय ते BAMS विद्यालय पर्यंत शोधा शोध केली असता अखेर टेकडीच्या मागच्या बाजूला आजी दिसल्या असून आजींना ताबडतोब कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश पोहरे, पवन सुरवाडे, कु. सुवर्णा चव्हाण, कोमल हिवराळे, लक्ष्मी कौलकार, करण राठोड, आशुतोष राऊत, इत्यादी सदस्य उपस्थित होते.यावेळी पातूर पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस कर्मचारी,होमगार्ड कर्मचारी तसेच रेणुका देवी संस्थानचे सहकारी यांनी सुद्धा यामध्ये सहकार्य केले.
Users Today : 39