पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी दिनांक -०२ एप्रिल २०२३ वार – रविवार या रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली तसेच एकलव्य आधार प्रतिष्ठाण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्लोद ग्रामपंचायत मध्ये शेडयाचापाडा, जाभुळवाडी,आंबेवाडी, रायपाडा, मानीचापाडा, शेरीचापाडा, व वडपाडा,या पाडयांतील तब्बल १५१ कुटुंबाना water on wheel ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटण्यात आले. या मागील एकच उद्देश आहे की, ज्या खेडो-पाड्यातील आपल्या महिला भगिनी आहेत. त्याचा वेळ वाचावा व डोक्यावरील दुडीचे ओझे कमी व्हावं या साठी हा उपक्रम राबविला जातो.या उपक्रमासाठी भा.ज.पा.आदिवासी आघाडी पालघर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. मिलिंदजी भाऊ झोले तसेच त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्यां पालघर जिल्हा सौ. कुसुमताई झोले यांच्या अतोनात प्रयत्नाने व त्यांच्या विनंतीस मान देऊन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली तसेच एकलव्य आधार प्रतिष्ठाण .या तिघांचा जोड होऊन हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे कुर्लोद ग्रामपंचायत मध्ये गाव-पाड्यामध्ये पार पडला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मा. श्री. गंगाराम फसाळे,श्री. नरेश झोले,श्री. अंकुश पाडेकर तसेच कुर्लोद ग्रामपंचायतचे सदस्य मा. श्री. रघुनाथ बुधर ,श्री. मनोज बुधर, भाऊ बुधर, मधुकर मोडक इत्यादी गावकरी तसेच मानीचापाडा या गावच्या आशा कार्यकर्ता सौ. रंजना फुफाणे आणि ज्यांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक गाव – पाड्यातील कुटुंबाची माहिती गोळा करतो असे या भागातील समाज सेवक मा. श्री. हनुमंत वाघ दादा इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
Users Today : 25