शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद/ तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ने वार्ड नंबर चार मधील गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नाल्यावर फुलाचे बांधकाम हे अंदाजपत्रका नुसार केलेले नाही व निकृष्ट दर्जाचे केलेले आहे अशी तक्रार सूनगाव येथील विजय वंडाळे व गजानन धुळे यांनी ग्रामपंचायतीला दिलेली आहे व 14 फेब्रुवारी रोजी कटविकास अधिकारी यांना दिलेले आहे परंतु गटविकास अधिकारी यांनी एक ते दीड महिना उलटून गेल्या नंतरही कोणत्याच प्रकारची चौकशी केलेली नाही व 28 3 2023 रोजी या पुलाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आले त्यामध्ये शाखा अभियंता घिवे विस्तार अधिकारी मोरे विस्तार अधिकारी टाकळकर अशी चौकशी समिती गठीत केली होती परंतु या समितीने आतापर्यंत कोणत्या प्रकारची चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे 23 मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार उपोषण इशारा दिला होता त्यानुसार आज दि 5 3 2023 पासून पंचायत समिती कार्यालय समोर उपोषणास बसले आहे भ्रष्ट अधिकारी व दुर्लक्षित गटविकास अधिकारी हे राजकीय दबावामुळे सदर तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे उपोषणास बसण्याचे वेळ आली आहे व जोपर्यंत या पुलाचे चौकशी व अंदाजपत्रका नुसार बांधकाम होणार नाही तो आमरण उपोषण चालू राहणार असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले आहे