समीर मेघें साठी डगर कठीण!
देवेंद्र सिरसाट.नागपूर./हिंगणा विधानसभा क्षेत्रात महिला सुध्दा प्रबळ दावेदार होऊ शकतात?सध्या काॅंग्रस पक्षात असलेले माजी मंत्री रणजित देशमुख यांचे चिरंजीव डॉ.आशिश देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा असुन ते हिंगणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे आमदार समीर मेघे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असे जानकर सांगताहेत.आशिष देशमुख यांच्या टीमकडून मेळाव्याची तयारी देखील सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या हिंगणा मतदार संघातून येत्या निवडणुकीत निवडणूक लढायची, अशी आशिष देशमुख यांची इच्छा आहे. काँग्रेसवर वारंवार आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होऊ शकते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार, शरद पवार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते राष्ट्रवादीचा मोठा मेळावा हिंगणा विधानसभा शेत्रामध्ये घेणार आहेत.आशिष देशमुख या मेळाव्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठ्या संख्येने बोलवणार आहेत. याच मेळाव्यात आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हिंगणा मतदार संघात भाजप विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रबळ आणि मोठा पुरुषामध्ये तरी उमेदवार नाही. महिला मध्ये दोनवेळा वेगवेगळ्या सर्कल मधून जिल्हा परिषद वर निवडून गेलेल्या जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण माजी सभापती सौ.उज्वलाताई बोढारे यांना राष्ट्रवादी पक्षाने व भाजपाने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गोतमारे , राष्ट्रीय काँग्रेसने नागपूर जिल्हा परीषदच्या उपाध्क्षप कुंदाताई राऊत या महिलांना संधी दिल्यास प्रबळ उमेदवार होऊ शकतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगणासाठी प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे या मतदारसंघात आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार म्हणून माजी आमदार आशिषबाबू देशमुख , संतोषभाऊ नरवाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग नागपूर ग्रामीण पुढे येऊ शकतात.