एकुण 6 लाख 55 हजार 936 रुपयाचा गुटखा व गाडीसह मुद्देमाल केला जप्त)
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
दिनांक 05/04/2023 रोजी पोलीस निरीक्षक संजय देशमुख व त्यांचे सोबत पोकाँ राठोड, असे विभागीय रात्रगस्तची पेट्रोलिंग करत असतांना पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली की, दिपक बोराडे यांचा गुटखा हा जालना कडुन मंठा रोडने जिंतूर जि.परभणी कडे जात आहे अशी माहीती कळविल्यावरुन पोलीस निरीक्षक संजय देशमुख व पोउपनि शिंदे, पोउपनि राऊत, पोहेकाँ राठोड, नापोकों गायके, पोकाँ राठोड, पोकों आढे, पोकों काळे, पोकों कातकडे पोकों घोडके, यांनी जिंतुर रोडवरील कर्नावळ पाटीजवळ सापळा लावला सकाळी 03.00 वा सुमारास एक पांढ-या रंगाचा बोलेरो पिकअप मंठा कडुन येत असतांना दिसला व सदर वाहनाच्या मागे मागे मोटार सायकलवर मंठा येथिल इसम नामे दिपक बोराडे हा येत असतांना दिसलो त्यावरुन पोलीस निरीक्षक संजय देशमुख व कर्मचारी यांनी सदर बोलेरो पिकअपला हात दाखवला असता सदर वाहन चालक याने व त्याच्या सोबत असलेला क्लिनर याने अंधारात वाहन थांबवुन मोबाईल गाडीतच सोडुन शेतात पळ काढला त्यानंतर सदरचे वाहन चेक केले असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल गुटखा मिळुन आला आहे.1) राज निवास गुटखा चे 404 पाकीटे प्रत्येक पाकीट किंमत 192 रु प्रमाणे एकुण किंमत 77,568/- रु.जर्दाचे 1216 पाकीटे प्रत्येक पाकीट किंमत 48 रु प्रमाणे एकुण किंमत रु1 58,368/-3) एक पांढ-या रंगाची बोलेरो कंपनीची पिकअप क्र. एम. एच. 22 किंमत 5,00,000/- अंदाजे,4) दोन मोबाईल किंमती प्रत्येकी 10,000/- रुअसा एकुण 6,55,936 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन बोलेरो पिकअप क्र. एम. एच. 22 ए. एन. 1581 चालक व त्यासोबत असलेला त्याचा क्लिनर व दिपक बोराडे यांचेवर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि शिंदे हे करीत आहेत.सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक डॉ. श्री. अक्षय शिंदे साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. डॉ. राहुल खाडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर श्री राजु मोरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख साहेब, पोउपनि शिंदे, पोउपनि राऊत, पोहेकाँ 3 राठोड, पोहेकॉ मेखले, नापोकाँ गायके, पोका मांगीलाल राठोड, पोका दिपक आढे, पोका प्रशांत काळे, पोका विलास कातकडे, पोकों घोडके, पोकों संतोष बनकर, पोकों आनंद ढवळे, पोकों आमटे, पोकों चव्हाण, पोकों आसाराम मदने, पोकों पांडुरंग हागवणे, पोकाँ विजय जुंबड, पोकाँ हाराळ, पोकाँ इलग यांनी कार्यवाही केली आहे.