सायबर गुन्हा घडल्यास पोलिसांना तक्रार करा – अर्चीत चांडक .

Khozmaster
1 Min Read

 

देवेंद्र सिरसाट दैनिक खोजमास्टर नागपूर/.आधी दरोडेखोर घरात घुसुन दरोडा टाकायचे.चोरांना सुद्धा चोरी करण्यासाठी घरापर्यंत याव लागायच परंतु आता चोरांना व दरोडेखोरांना घरी यायची गरज नाही.आपण वापरत असलेल्या मोबाईल हा अतिशय काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे.थोडी जरी चुकभुल झाली तरी आपली फसवणूक होऊ शकते.तेंव्हा । आभासी पद्धतीत दक्ष रहा व फसवणूक झाल्यास ! खतात्काळ पोलिसांना तक्रार करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर जिल्ह्याच्या वतीने वानाडोंगरी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डाॕ.गिरीश गांधी होते.तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नागपूर जिल्हा अध्यक्ष महेश बंग,उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे,अभय महाकाळकर,डाॕ.अनिल इदाने,डाॕ.उल्हास मोगलेवार ,निलेश खांडेकर , डाॕ.मंजुषा सावरकर , वर्षाताई गुजर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबन आव्हाळे उपस्थित होते.आज प्रत्येक माणसांच्या हातात मोबाईल आहे.त्यामुळे बरेच लोक आता आॕनलाइन फोन-पे ,गुगल-पे व इतर माध्यमातून आर्थिक व्यवहार करतात.तसेच सायबर गुन्हेगार सुद्धा वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.तेंव्हा प्रत्येकांनी अतिशय काळजीपूर्वक व्यवहार करा.व फसवणूक झाली तर पोलिसांना तक्रार करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी उपस्थितांना केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॕ.मंजुषा सावरकर यांनी तर संचालन सौ.अरुणाताई बंग व आभार निलेश खांडेकर यांनी मानले.याप्रसंगी विद्यार्थी ,शिक्षक व पालक उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *