गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा/.केंद्र सरकार व राज्य सरकार कडून विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला.यात *श्री विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदई एक्को* येथून शिक्षण घेतलेल्या सात विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली.या विद्यार्थ्यांचा *भव्य सत्कार सोहळा* विद्यालयाच्या वतीने आयोजित केला होता.यात *ज्ञानेश्वर गवळी,निर्मला गवळी(पुणे पोलिस)रवी डवले,अनिल डवले(नागपूर पोलिस),रामेश्वर तळेकर (भारतीय रेल्वे),दत्ता मोरे(इंडियन नेव्ही)व विनोद शेजुळ(SRP छ. संभाजी नगर)* या यशवंतांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालय व शिक्षकांबद्ददल ऋण व्यक्त केले.*श्री जे व्ही वाघमोडे सर यांनी यापेक्षाही उंच पदावर जावून आम्हाला सत्काराची पुन्हा संधी उपलब्ध करून द्यावी हि भावना व्यक्त केली* तर विद्यालयाचे मुख्याध्यापक *श्री एस एन जगताप सर यांनी या सात विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे आवाहन केले.व परिसरातून यशस्वी झालेले विद्यार्थी हे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत याचा अभिमान वाटतो अशी भावना व्यक्त केली.*_ _त्याच सोबत *आम्हा बहिण-भावाच्या यशामुळे आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले हि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.* अशी भावना ज्ञानेश्वर गवळीने व्यक्त केली._या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.__कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय पिंपळसे सर यांनी केले तर आभार श्री गजानन पडुळ सर यांनी मानले._