प्रकाश सोळंके जिल्हाध्यक्ष जालना
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.शेतकऱ्यांच्या खात्यात अनेक दिवस प्रतीक्षा करून उशिराका होईना अतिवृष्टी अनुदान जमा झाले असुन कर्ज वसुलीच कारण दाखवून बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे खाते होल्ड मारून शेतकऱ्याची पिळवणूक चालविली आहे बँक अधिकाऱ्याचा मनमानी कारभार थांबवण्यासाठी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी मा.जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन दिले निवेदनात सोळंके पुढे म्हणाले की जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांचा परस्पर व्यवहार (होल्ड) बंद करून खातेदारांना नाहक त्रास देत असल्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,कारण बँकेच्या अशा धोरणामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे, केंद्र अथवा राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात संबंधित खातेदारांना आर्थिक मदत मिळते ती मिळत त्या खातेदारांना त्याची परिस्थिती पाहून त्याला सरकारने केलेली मदत मिळत नाही, याला जबाबदार संबंधित बँकेचे धोरण आहे, संबंधित बँकेच्या मॅनेजरला याबाबत चौकशी केली असता आमच्या वरिष्ठांशी बोलून घ्या अशा प्रकारचे उडवा उडी चे उत्तर दिले जातात, शासनाने केलेली मदत आणि संबंधित खातेदाराच्या खात्यात वैयक्तिक असल्याने त्या त्या शेतकऱ्यांच्या खाते बँक होल्ड कसे लावू शकते, आपण स्वतंत्र देशात राहतो आपल्या देशातून इंग्रज गेले का नाही संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचा व्यवहार पाहून असा प्रश्न उपस्थित होतो, खरे तर हा मानसिक त्रास देण्याचा हेतू काय आहे बँकेचा हेच कळत नाही शासनाकडून मिळालेला निधी मदत ही सुद्धा गोठवल्या जाते अशा परिस्थितीमध्ये संबंधित खातेदार शेतकऱ्यांनी कसे जगायचे त्या बिचारांच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये कष्ट करून शेतकरी रात्रंदिवस काम करतो परंतु बँकेच्या आडून धोरणामुळे शेतकऱ्यांना हा त्रास होतो याच्यावरती तत्काळ मा.जिल्हाधिकारी जालना यांना आदेश देऊन हा मार्ग मोकळा केला पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा आहे.कारण जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांचा परस्पर व्यवहार (होल्ड) बंद करून शेतकरी खातेदारांना नाहक त्रास देत असल्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्या यावी तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या जाचकाठी शिथिल करून शेतकऱ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी अशा प्रकारे भयंकर त्रास देणारे प्रकार थांबून जाचक अटी शिथिल करून शेतकऱ्यांसाठी हा मार्ग मोकळा करावा असे निवेदनात नमूद केले आहे.