मेहकर प्रति /उकळीआज दिनांक 14 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती जगदंबा माध्यमिक विद्यालय उकळी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जगदंबा माध्यमिक विद्यालय उकळी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वरसावंत गुरुजी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पि.डी.नवले सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सन्माननीय अध्यक्ष सावंत गुरुजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बोलत असताना ते विश्वरत्न होते. बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षमय जीवन गाथेचे वर्णन सन्माननीय अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून दिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना, डॉ. बाबासाहेब यांच्या दिलेल्या मार्गावर चालण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक पि. डी. नवले सर यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश रहाटे सर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी आवर्जून हजर होते. विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.