डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमुळे मनुवाद्यांचा अंत.. श्याम उमाळकर.

Khozmaster
2 Min Read

मेहकर प्रति /महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिल आणि याच संविधानाच्या माध्यमातुन आज मनुवाद्यांचा अंत झाला.भारतीय सविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरीकांचा विचार करून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहण्याच काम केले,परंतु आज पुन्हा मनुवादी आपले डोके वर काढत आहे त्यांना ठेचण्याच काम तसेच संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी जागृत राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सरचिटणिस श्यामभाऊ उमाळकर यांनी केले,ते मेहकर शहर कांग्रेस कमेटीच्या वतिने स्थानिक डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये आयोजित डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बोलत होते.   या कार्यक्रमाला पक्षनेते अॅड अनंतराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, भीमशक्तीचे राज्य सरचिटणिस भाई कैलास सुखदाणे, शहराध्यक्ष पंकज हजारी, सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर, माजी नगराध्यक्ष राजेश अंभोरे, माजी नगरसेवक अॅड जगन्नाथ निकस, माजी नगरसेवक माजी प्राचार्य डि.जी.गायकवाड, माजी नगरसेवक संजय म्हस्के, बुलढाणा जिल्हा महिला सेवा दलाच्या अध्यक्षा सौ आरतीताई दीक्षित, त्यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.    या कार्यक्रमाला किसन पाटील वानखेडे,आर एस खिल्लारे साहेब,युनुस पटेल,नारायण पचेरवाल,शाहुभाई गवळी,वैभव उमाळकर,रियाज कुरेशी,छोटु गवळी,राहुल वानखेडे,सुरेश सरकटे साहेब,मुनाफ खान,प्रकाश सुखदाणे,सुजाताताई गवई,साधनाताई इंगळे,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    यावेळी आजपासून नवीनच मेहकर शहरांमधून प्रकाशित होणारे दैनिक विदर्भ जगत अंकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मोटर सायकल रॅलीचे सभेमध्ये आगमन होताच त्यांचे हार घालून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय वानखेडे तर आभार नारायण इंगळे यांनी केले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *