वझर सरकटे : पथकांचा मीनीडोरमधुन प्रवास ; खब-यांना चकमा देत कारवाई
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा :–मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून वझर सरकटे येथून रात्रीच्यावेळी अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती . महसूलच्या पथकाने वाळू माफियांच्या खब-याला चकमा देत अवैध वाळू वाहतूकीचे दोन टेम्पो बुधवारी पहाटेच्या सुमारास पकडले. वझर सरकटे ( ता. मंठा ) येथून पूर्णा नदीपात्रातून रात्रीच्यावेळी अवैध वाळूचे उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना मिळाली होती. मात्र , महसूलचे पथक कारवाईसाठी येत असल्याची वाळू माफियांना खब-याकडुन माहिती मिळत होती . त्यामुळे कारवाई होत नव्हती. त्यामुळे रात्रभर गस्तीवर असलेल्या मंठा तहसीलच्या पथकातील ढोकसाळ मंडळ अधिकारी डि बी बेले , तळणीचे तलाठी जी आर कुटे , उस्वदचे तलाठी नितीन चिंचोले, पाडळी दुधा तलाठी डि आर गाडबे यांनी सकाळच्या वेळी सरकारी गाडी परत पाठवून खाजगी मालवाहक मीनीडोर मधून प्रवास करत मद्दतीला तळणी पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार आर एम मुंढे यांना सोबत घेऊन खब-याना चकमा देत वझर सरकटे येथून अवैध वाळू वाहतूकीचे एकामागे एक दोन टेम्पो क्र. एम एच २१ बीएच ४८५१ व एम एच २१ बीएफ ३९६३ पकडले. पुढील कारवाईसाठी दोन्ही टेम्पो सेवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .