गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीतील ग्रामपंचायती व सोसायटया वर 90% भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याने आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच्या सर्व 18 जागा भारतीय जनता पक्ष प्रचंड मताधिक्यांनी स्वबळावर जिंकेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी तालुका परतुर आयोजित आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकीच्या संदर्भात आज खंडेश्वर जिनींग आष्टी येथे मतदाराचा मेळावा संपन्न झाला.या वेळी मार्गदर्शन करताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघांचे आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. या वेळी मंचावर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री राहुलभैय्या लोणीकर भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे, रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात सिद्धेश्वर सोळंके बाबाराव थोरात संपत टकले कृष्णा टेकाळे राजेंद्र बाहेती, सिताराम राठोड, गजानन लोणीकर, सुमंत पाटील, सिद्धेश्वर केकान, बबलू सातपुते गजानन लिपणे, गणेश सोळंके, बबलू सातपुते, अमोल जोशी, भगवान ढवळे, अनंत आगलावे आसिफ कच्ची रफिक राज, मारुती थोरात, उमेश सोळंके गजानन लोणीकर यांची उपस्थिती होती. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीतील हजारो उपस्थित मतदारांन समोर आमदार लोणीकर यांनी गावागावत केलेली विकास कामे व प्रत्येक गावाला आणलेला विकास निधी चा पाढा च वाचला. या या मेळाव्याला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.