चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ते ११ संचालक अपात्र घोषित! जिल्हा’उपनिबंधकाचा निर्णय

Khozmaster
2 Min Read

चिखली (मन्सूर शहा.). प्राप्त माहिती अनुसार उमेदवारी अर्ज माघार घेण्याला दोन दिवस उरले असता चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठे मोड आले.असून. निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेले ११ माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक यांनी १७ एप्रिल रोजी बाद केल्यामुळे सदर निवडणुकीमध्ये आता राजकारण चांगले तापले असल्याचे चिखली तालुक्यात दिसत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० एप्रिल रोजी संपत आहे तथापि निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी ५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रसंगी विष्णू पुरुषोत्तम कुल सुंदर रा. तोरण वाडा, ता . चिखली सत्येंद्र कृष्णराव भुसारी रा. भोरसा, -भोरसी ता. चिखली रूपराव तुकाराम सावळे रा. गंगालगाव ईश्वर भीमराव इंगळे रा.उत्तरादा पेठ विजय दिनकर शेजोल रा. सावंगी संजय माणिकराव गाडेकर रा. तेल्हारा, मनोज पांडुरंग खेडेकर रा. अत्री खेडेकर चिखली गजानन तुळशीराम पवार राहणार इंदिरानगर चिखली काशिनाथ विशंभर आप्पा बोंद्रे रा. जयस्तंभ चौक चिखली सुमनबाई मधुकर मस्के रा. पांढरदेव आणि गजानन शंकर मोरे रा. दीवठाणा या ११ माजी संचालकाचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते कैलास हिरामण शर्मा यांनी वरील ११ उमेदवाराच्या विरोधात घेतलेल्या आक्षेपामुळे सदर उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेल्या त्या निर्णयाविरोधात ११ जणांनी एकाच वेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते त्यामध्ये जिल्हा उपनिबंधक यांना आपले उमेदवारी अर्ज बाद करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावर कोणताही ठोक निर्णय न देता जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सदर प्रकरण अंतिम निर्णय साठी सोपवले होते त्यानुसार जिल्हा उपनिबंधक आणि आज निर्णय घेतला आहे. .

 

0 9 3 7 5 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *