मेहकर/राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाओ फाउंडेशन अरावली विहार कॉलनी बानसुर अलवर राजस्थान या अभियाांतर्गत,जिल्हा बुलढाणा तालुका मेहकर येथे नारी शक्ती ग्रूप यांच्या वतीने समाज सेवेचे काम सुरू करण्यात आले आहे,या मध्ये ज्या गरीब मुलांना मुलींना शिक्षण मिळत नाही.त्यांना या महिला कडून मदत व इतर समाजसेवा कार्य राबवण्यात येत आहे,यात प्रामुख्याने गोर गरिबांची सेवा व गरजू पर्यंत मदतीचा हात पोहचवण्यात येत आहे यात महाराष्ट्र अध्यक्ष पिंकी राजपुत ,श्वेता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर तालुका येतील कल्याना येथे विविध कार्यक्रमाचे आवोजन करण्यात आले व सर्व नारी शक्ती ग्रूप च्या जिल्हा अध्यक्षा सौ.शिल्पा पंकज देशमुख,उपाध्यक्ष सौ .दिपाली पुरुषोत्तम जौजाळ, सौ.अनघा आकाश बोरकर,सौ.नंदा मनोज खंडागळे,सौ.सुवर्णा विशाल जौजाळ ,सौ.अनुराधा राजेंद्र महाले, सौ प्रिया पांडुरंग मेटकर,यांच्या हस्ते दिनांक 16/04/2023 रोजी रविवार ,मेहकर तालुका मध्ये कल्याणा येथे जन्माला आलेल्या कन्यारत्न चा बेबी ड्रेस देऊन स्वागत करण्यात आले ,तेथील महिलाना नारी शक्ती बद्दल जन जागृती करण्यात आली व तसेच तेथील मुलींना डान्स, रांगोळी ,मेहंदी क्लासेस विनामूल्य घेण्याचे या नारी शक्ती ग्रूप ने ठरवले तसेच यांनी अंगण वाडी मधील मुला मुलींना बिस्कीट चे वाटप केले ,तसेच त्या कल्याना ग्रामपंचायत चे सरपंच श्री संजय सोनुने ,सौ वर्षा निलेश काळे, यांनी विशेष सहकार्य केले . कल्याणा ग्राम पंचायत येथील महिला उपस्थित होते.