सतीश मवाळ /मेहकर देऊळगाव माळी येथे विविध सामाजिक कार्यक्रम, ग्रंथ तुला, जिल्हा भूषण पुरस्कार वितरण व संदीप पाल महाराजांचे किर्तन संपन्न झाले. कलेसाठी अवघी जीवन समर्पित करणारे हरिभाऊ राऊत यांचे मूर्ती कलेतील योगदान खरच खूप मोठ आहे. याची दखल घेत तरुणाई फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जिल्हा भूषण पुरस्कार देऊन सन्मान सोहळा पार पडला. कला महर्षी हरिभाऊ राऊत यांच्या कार्याची दखल अगोदर महाराष्ट्र शासनाने सुद्धा घेतली आहे. त्यांच्या या अमृत महोत्सवानिमित्त 25 एप्रिल रोजी दिग्गज मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत तरुणाई फाउंडेशन आयोजित महोत्सव सोहळ्यात हरिभाऊ राऊत यांची ग्रंथ तुला, त्यांच्यावर आधारित लघुपट, पुरवणी विशेषांक, व सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीप पाल महाराज यांची कीर्तन सोहळा संपन्न झाला, यावेळी बुलढाणा अर्बन मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झवर, उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ, यांना जिल्हा भूषण तर दे. माळी गावचे भूमिपुत्र उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे, यांना देऊळगाव माळी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एन.ए.बळी सेवानिवृत्त शाखा अभियंता, हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमादरम्यान प्रत्येकजण स्वत:च्या वडिलांचे कष्ट आठवत होता. जन्मदात्याच्या भावना काय असतात, हे जाणून घेत होता. एकंदरीत, बाप काय असतो, हे प्रत्येकाला कळत होतं. बापविषयक भावनांचा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आणि तो देऊळगाव माळी सारख्या गावात होत होता. अठरा पगड जाती-बारा बलुतेदार समुहातील कुंभार परिवारात जन्मलेल्या हरीभाऊ राऊत यांचा खडतर प्रवास लघुपटाद्वारे सर्वांनी जाणून घेतला. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. अल्पभूधारक कैलास राऊत वडिलांचा संघर्ष समाजासमोर मांडू शकतात, वडिलांचा गौरव करतात, तर नोकरदार-व्यावसायिक- उद्योजक, राजकारणी हे का करू शकत नाहीत? जेणेकरून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण होईल. व तरुण पिढी चांगल्या कामाकडे वळतील.उपरोक्त कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद बापू देशमुख ,पत्रकार राजेंद्र काळे, ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक गणेश निकम केळवदकर, संपादक रणजीत सिंग राजपूत, त्यागमूर्ती आर.बी मालपाणी, युवा उद्योजक किशोर गारोळे,व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोषराव थोरहाते, सरपंच किशोर गाभणे, गटविकास अधिकारी गजानन पाटोळे, गजानन चनेवार, समाधान पदमने पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष बाबुराव बळी, टी.एल मगर, गजानन चनेवार, निलेश नाहटा, मेहकर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार निर्मला परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजीत सिंग राजपूत, अनिल कलोरे, संजय जाधव, पंकज लोणकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कैलास राऊत यांनी मानले. अभूतपूर्व असा कार्यक्रम पार पाडण्यासाठी तरुणाई फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व कैलास राऊत व त्यांचे मित्र यांनी परिश्रम घेतले.