पातुर परीसरात पाऊसाचा कहर ! शेकडो हेक्टरवरील पिकाची नासाडी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

 

पातुर तालुक्यातील बोडखा चिंचखेड सह पातुर शहरात 30 सप्टेबरला दुपारी तिन वाजताच्या दरम्यान वादळी हवेसह विजेच्या कडकडात धो धो पाऊस झाल्याने पिकासह अनेक विद्युत उपकरणाचे मोठे नुकसान झाले आहे. पातुर तालुक्यातील बोडखा चिंचखेड व पातुर शहर नजीक परीसरात वादळी हवेसह विजेच्याच्या कडकडाटने सर्वत्र हाहाकार झालेचे चित्र झाले आहे .शेतातील केळी आंबा सह कपाशीचे पिक पुर्ण वा-याने कोलमडुन पडले शेतकऱ्यांचे तोंडात आलेला घास हा या परतीच्या पावसाने हिरावुन घेतला . शहराती विद्युन उपकरणे विजेच्या धक्याने जळुन गेली तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युत खांब , तारा तुटुन पडल्या आहे. या परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसुल विभागाकडुन चालु झाले असुन बातमी लिहस्तोर किती हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले या अधिकृत अंदाज सांगता येणार नाही .पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *