गजानन माळकर.जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा./ तालुक्यातील तळणी येथील दोन गरजूंना आज ग्रामपचायत सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यानी दोन कुंटुबांना आर्थीक मदत केली दोनही कुंटूबं अत्यंत गरीब असून त्याना समाजाच्या मदतीचा आधार होणे गरजेचे आहे माणूसकीच्या नात्यातून व त्याची आर्थीक दुर्बलता यामुळे बघून अशा गरजूना समाजाच्या माध्यमातून मदत होण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेऊन एक माणूसकी जपण्याचा नविन पांयडा सुरू केला असल्याने व त्यानी केलेल्या मदतीमुळे ते कौतूकास पाञ आहेत गावातील एक गरीब कुटुब महादेव गुडघे अत्यंत कष्ट या कुटुबांन सोसले महादेवराव याचे दोन तिन वर्षा पूर्वीच निधन झाले दोन मुल मुलीची जबाबदारी आईकडे आली त्याना दोन मुली एकीचे लग्न झाले तर दुसर्या मुलीचे लग्न काही दिवसावर येऊन ठेपले असल्याने आर्थीक जुळवाजुळव सुरु झाली सामाजीक कार्यात अग्रेसर असणारा पांडूं अण्णा व गौतम सदावर्ते सरपंच जेव्हा हा विषय कळाला की लगेच त्या कुटुंबासाठी आर्थीक मदत उपलब्घ करून दिली दुसरे कुटूबं दताञय पारसकर यांचे स्वःत गंवडी काम करणारा दताञयला काम करत असतानाच अर्धागवायूचा तीव्र झटका आल्याने त्याचा एक हात व एक पाय पूर्णपणे निकामी झाली स्वःत जवळचे काही व ऊसण वारी करून त्यानी औषध उपचार केले थोडेफार बर वाटले की गावातील मोकाट जनावरे अंगावर येतात की काय याच्या भितीने तो पडला कंबरेचे हाड मोडले डॉक्टरानी औपरेशन सांगितले . खर्च ही मोठा होणार या भीतीन तो दोन महीन्यापासून जाग्यावर पडून आहे काल या दोघांनी त्या कुंटुंबाला ही मदत केली समाजात अनेक दानशूर आहेत त्यानी अशा गरजूना मदत करणे गरजेच आहे गावातील या दोन कुंटूबाची परीस्थीती खूप गरीबीची आहे त्याना मदतीची गरज आहे अशा गरजुनां मदत केल्यावर एक वेगळेच समाधान प्राप्त होते गरज आहे आपल्या दानशूर वृतीची अनेकांनी या कृटुंबाना मदत करावी असे आवाहन सरपंच गौतम सदावर्त व पांडू अण्णा जनक वार यांनी केले