रामा.२२३ ते दैठणा,माव,पांडेपोखरी ते रामा.६१ प्रजिमा ४१ या रस्त्यावर ३ कोटी,५० लाख रुपये विकास कामाच्या नावाखाली चुराडा. प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष

Khozmaster
3 Min Read

गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी

मा.मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली, तक्रार निवेदनात पुढे म्हटले आहे की,जालना जिल्ह्यात मे सई कंट्रक्शन या एजन्सीने बोगस काम करण्यासाठी २०१४ पासून धुमाकूळ घातला आहे, या कंट्रक्शन कंपनीने पीडब्ल्यूडी चे उप अभियंता ते कनिष्ठ अभियंता संबंधित कर्मचारी यांना हाताशी धरून बोगस इस्टिमेट तयार करून त्याला मंजुरी आणल्यानंतर अनेक ठिकाणी काम न करता एजन्सी बिल उचलून घेते, ज्या ठिकाणी संबंधित एजन्सी काम करते त्या ठिकाणी ५० टक्के काम संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस काम करते, याचे उत्तम उदाहरण : तालुका परतुर येथील पीडब्ल्यूडी अंतर्गत रामा.२२३ ते दैठणा,माव,पांडेपोखरी ते रामा.६१ प्रजिमा ४१ रस्त्यावर ३ कोटी,५० लाख रुपय खर्च होत आहे रस्त्याचे काम अंदाजा पत्रकाप्रमाणे होत नसून संबंधित सई कन्ट्रक्शन या एजन्सीने पन्नास टक्के काम बोगस करून शासकीय निधी चुना लावला, या कामावरती दुर्लक्ष केले म्हणून उप अभियंता परतुर, कनिष्ठ अभियंता श्री.वाघमारे परतुर यांनी शासकीय कामात कुचराई दिरंगाई मुद्दाम दुर्लक्ष केले म्हणून बडतर्फ करण्यात यावे संबंधित साई कंट्रक्शन एजन्सीवर ब्लॅक लिस्ट करून कारवाई करण्यात, या कामावरती तीन किलोमीटर रस्त्यावर विहिरीवरच्या दगडाचे ढीग टाकून रस्ता ब्लॉक केला आहे या रस्त्यावरून पूर्णपणे दळणवळण बंद आहे, शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाचे दिवस आहेत परंतु संबंधित एजन्सी ना रस्ता बंद केला ड्रायव्हरच्या केले नाही रस्ता का बंद केला हे सुद्धा कळायला तयार नाही, काही ठिकाणी रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण केले ते डांबरीकरण काम हाताने उखडू लागले, या रस्त्यावरच्या फुलाचे काम न करता संबंधित एजन्सी बिल उचलून घेणार आहे, अगोदर फुलाचे काम व्हायला हवे होते नंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हायला हवी होती परंतु पुलाचे काम झाले असे दाखवले जुन्या फुलांची डाग दुखी करून नवीन बांधकाम केले असे चित्र निर्माण करून शासनाला दिवसाढवळ्या फसवले आहे, साई कंट्रक्शन ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे हा संशोधनाचा भाग आहे कारण या एजन्सी संबंधित राजकीय नेते आहेत का कारण ही एजन्सी कुठल्याही कामाच्या अटी व शर्ती चे उल्लंघन करून बोगस काम करण्यास माहिर आहे सुद्धा या सई कंट्रक्शनवर कठोर कारवाई झालेली नाही, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या एजन्सीने बोगस काम केले म्हणून अनेक वेळा निवेदन देऊन सरकारकडे तक्रारी करण्यात आल्या परंतु सई कंट्रक्शन ला अद्याप हि ब्लॅक लिस्ट केले नाही, या बोगस पद्धतीच्या कामामुळे देशासह राज्याचे नुकसान होते बोगस काम केल्यामुळे अनेक वेळा त्याच त्याच रस्त्याचे डबल डबल काम करावे लागते शासनाचा पैसा जातो सामान्य जनतेला नहाक त्रास सहन करावा लागतो म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे,संबंधित उपअभियंता कनिष्ठ अभियंता यांना बडतर्फ करून, सई कंट्रक्शने जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस काम केल्यामुळे या एजन्सीला मराठवाड्यात काम करण्यास बंदी घालावी, या एजन्सीच्या पाठीमागे नेतृत्व उभे असल्यामुळे चौकशी होईल किंवा नाही अशी शंका आहे? परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून जनतेसमोर मांडणार आहोत. या रस्त्याची पाहणी करताना सोबत मनसे उपजिल्हाध्यक्ष राम नवल, या भागातील दळणवळण करणारे शेतकरी उपस्थित होते,

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *