गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी-
नगर पंचायत मंठा मधील खकर्मचारी अनु.1)शशिकांत देशमुख (लिपिक) 2) महेंद्र देशमूख (लिपिक )3) सखाराम बोराडे (वायरमन ) 4) सुरेश घनवट 5) सुनील बोराडे( शिपाई ) 6) जीवन अंभुरे (वॉचमन ) हे सर्व कर्मचारी मंठा ग्रामपंचायत्ती मध्ये 1/3/2015 ला ठरावाप्रमाणे कामावर घेण्यात आले नंतर ऑगस्ट 2015 ला नगर पंचायत निर्माण झाली परंतु कर्मचाऱ्यांची नोकरी पुढे चालू राहिली होती त्यांना कुठलीही नोटीस न देता कपात मोबदला न देता अचानक 31/12/2017 ला तोंडी आदेशानी कामावरून कमी केले होते औद्योगिक विवाद कायदा 1947 च्या कलम 25 B, F, G चा भंग केल्यामुळे कर्मचारी यांनी कामगार न्यायालय जालना येथे बडतर्फी आदेशाला आव्हाण दिले होते. त्यांची बडतर्फी बेकायदेशीर असल्याचे घोषित करून आणखी अतिरिक्त त्यान्ची सेवा मागील सेवासातत्यसह 20% मागील वेतन सुद्धा देववीण्याचे आदेश नगर पंचायतीला मा.कामगार न्यायाधीश श्री. शा. शँ जहागीरदार कामगार न्यायालयानी दिले आहेत. कर्मचारी वर्गात आनंदाची लहर उमटून त्यांचं प्रकरण यशस्वी करणाऱ्या जेष्ठ विधिज्ञ् ऍड. डी. पी. पाटील आणि ऍड माधवी थत्ते जालना यांचा सुहृदय सत्कार केला आहे.