देवेंद्र सिरसाट.
(दै,खोजमास्टर)
नागपूर.
कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी (सीएसआर) माध्यमातून एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, एमआयडीसी हिंगणा जिल्हा नागपूर या कंपनीने सामाजिक दायित्व स्वीकारून हिंगणा तालुका आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात दिला .
हिंगणा तालुका अंतर्गत विविध आरोग्य संस्थानच्या माध्यमातून होऊ घातलेल्या रुग्णसेवा उत्तरोत्तर उत्तम व्हाव्यात तसेच रुग्णांना आवश्यक त्या सेवा शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून पूर्त व्हाव्यात या दृष्टिकोनातून एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या सीएसआर निधीमधून भक्कम सहाय्यता प्रदान केली.
यात प्रामुख्याने रुग्णांसाठी वॉटर कुलर, स्टेथेस्कोप, हिमोग्लोबिनोमीटर, नेब्युलायझर मशीन, ग्लुकोमीटर, फूट ऑपरेटेड सक्शन मशीन, वजन काटे, अत्यावश्यक औषधी तसेच तालुका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी एक संगणक व एक प्रोजेक्टर या साहित्यांचा समावेश आहे. सदर साहित्य वितरणाचा सांकेतिक सोहळा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या कार्यालयीन कक्षेत घेण्यात आला असून या कार्यक्रमाला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षा मेश्राम, एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, हिंगणा कंपनीचे प्लांट हेड दुष्यंत पाठक, संजय बेडेकर, पराग गोखले व तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा डॉक्टर प्रवीण पडवे यांच्या उपस्थितीत सदर साहित्य वितरणाचा सांकेतिक कार्यक्रम घेण्यात आला.
यापूर्वी सुद्धा एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा कंपनीच्या सीएसआर निधी मधून आरोग्य उपकेंद्र निलडोह व डिगडोह या ठिकाणी बाह्य रुग्ण प्रतिक्षालय शेड, त्यांना बसण्याची व्यवस्था,
समुदाय आरोग्य अधिकारी यांना बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, रुग्णांना पिण्याच्या पाण्याकरिता वॉटर कुलर तसेच स्वतंत्र महिला व पुरुष शौचालय तयार करून देण्यात आले.
सोबतच आर्थिक वर्ष 2022 23 मध्ये अडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला बाह्य रुग्ण प्रतीक्षालय शेड व बैठकी करिता स्थायी खुर्च्यांची व्यवस्था करून देण्यात आली.
या उपर तालुका हिंगणा अंतर्गत पाच आयुर्वेदिक दवाखाने यांना रुग्णांना स्वतंत्र स्त्री पुरुषांकरिता वेगवेगळे शौचालय निर्माण करून देण्यात आली.
या उपलब्ध करून दिलेल्या सोयीच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून रुग्णांना उत्तरोत्तर उत्तम सेवा प्रदान करण्यात येईल अशी ग्वाही तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा डॉक्टर प्रवीण पडवे यांनी दिली व एल्केम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड हिंगणा कंपनीच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.