गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील माळेगांव येथे प्रा. माधवराव चव्हाण यांच्या पुढाकारातून व सहकार्यातून आणी सामाजिक दृष्टीकोण समोर ठेवून विवीध संकल्पनेतुन सामाजिक धामीक कार्यक्रम राबविले जात आहे.. माळेगांव येथे ज्यांना आधार नाही अशा गरजुंना शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असतांना आपले गांव परिसर व समाज या महत्वाकांशी योजनांपासून कोसोदूर असल्याने अशाच प्रकारच्या गरिबांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविण्यात येणा-या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वयोवृध्द योजना, इंदिरा गांधी वृध्यकाळ योजना, या सर्व महत्त्वाकांशी योजनांचा आपल्याही गावातील गरजुंना लाभ मिळावा यासाठी गावातील गोरगरीबांना या योजनांसाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवा जुळव करतांना होणारी दमथाक व गरीबांना शहराच्या ठिकाणी मोल मजुरीची काम धंदे सोडून (अनेकवेळा चकरा मारूनही कामे मार्गी लागत नाही. यास्तव माझ्या गावातील गोर गरीबांना या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या हेतुन माळेगांव येथे एकाच ठिकाणी योग्य त्या लाभार्थ्याकडून लागणारी कागदपत्रे घेवून त्याच ठिकाणी महा-इ-सेवा केंद्राच्या माध्यमातुन कागदपत्रे आईलाईन करून गावातच सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या संबंधिचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे काम प्रा. माधवराव चव्हाण व मित्रमंडळाच्या वतीने रावण्यात येत असुन या गोरगरीबांना लाभदायी ठरणा-या कार्यक्रमांचे उदघाटन माळेगांव येथील मारोती मंदिरावर सोमवार दि.०८.०५.२०२३ रोजी मंठा तालुक्यातील नाव लौकीक असणारी शैक्षणिक संस्था स्वामी विवेकांनद महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी माधवराव चव्हाण यांच्या कार्यामुळेच मिळणार निराधारांना आधार असे प्रतिपान उपप्राचार्य डॉ. सुधाकर जाधव यांनी केले व गावकर यांना येणा-या संधीचा लाभ घ्यावा व ज्यांचे कर्म त्यांच्या सोबत असते आज प्रा. माधवराव चव्हाण जनतेचे सेवा करत असुन त्यांचा आपण सर्वांनी पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन गावक-यांना केले व प्रा. माधवराव चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी गावातील नागरीक युवा वर्ग व या योजनांसाठीचे लाभार्थी आपली कागदपत्रे घेवून मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जालना जिल्हा सीएचओ डॉ. संघटने जिल्हा अध्यक्ष डॉ सोपान चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रा. माधवराव चव्हाण, गणराया महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राहुल राठोड, तांबोळा येथील सरपंच संजय चव्हाण, सोमनाथ राठोड, पांडुरंग राठोड, पंडीत राठोड, मोहन राठोड, गोरखनाथ राठोड, सेवकराम राठोड, पंढरीनाथ चव्हाण राजेश राठोड, नारायण राठोड, शामराव राठोड, जगन पवार, वालचंद राठोड, विनायक राठोड, गौतम रंजवे, प्रकाश जाधव, अर्जुन राठोड, गजानन चव्हाण, भगवान चव्हाण, करण राठोड, स्वप्निल राठोड, विजय राठोड यांची उपस्थिती होती..