गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा तालुक्यातील ऊस्वद येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसुल पथकाला पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात बाळूची ट्रॉली पलटी झाल्यानंतरही सोबत्याच्या मदतीने नायब तहसीलदाराला धमकावत ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन पसार झाला. ही घटना ता.५ मे रोजी दुपारी उस्वद ( ता. मंठा) शिवारात घडली. जालना जिल्ह्यात नवीन धोरणानुसार बाळू लिलाव प्रक्रियाकडे लिलाव धारकांनी दुर्लक्ष केले. परिणामी एकही बाळू डेपो सुरू झाला नाही. त्यामुळे चोरट्या मार्गाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होतांना दिसत आहे. त्यांतच अवैध वाळू वाहतूकीला प्रतिबंध करतांना महसूलच्या अधिकारी कर्मचा-यांना वाळू माफियांच्या रोषाला कसं सामोरे जावे लागत असल्याचे कारवाई दरम्यानचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. मंठा तालुक्यातील उस्वद येथुन पुर्णा नदीपात्रातून अवैध वाळू ट्रॅक्टरमधुन वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसूलच्या पथकाला न जुमानता माळरानांवरील खडतर रस्त्याने भरधाव वेगाने व निष्काळजीपूर्वक पळून जाण्याचा प्रयत्नात बाळूची ट्रॉली उलटली. तर बाळूसह ट्रॉली घटनास्थळी सोडून सोबत्याच्या मदतीने पथकातील नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, तलाठी रविंद्र लागोर, नितीन चिंचोले व कोतवाल राजेंद्र चिंचाणे यांना धमकावत ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन वाळूमाफिया पसार झाला. याप्रकरणी नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गजानन भास्कर जाधव रा. उस्वद व अन्य विरुद्ध कलम २७९ भादवी सह कलम ३ व ४ गौण खनिज अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.