बुलडाणा, दि.9 :- बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम छेदण्यासाठी मान्सूनपूर्व कापूस लागवड थांबविणे गरजेचे झाले आहे. मात्र या बाबीकडे सतत दुर्लक्ष झाले. यातुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. यावर मात करण्यासाठी कृषि विभागाचा निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण विभागाने जिल्ह्यामध्ये १ जुन नंतरच शेतक-यांना कपाशीचे बियाणे विक्री करण्याच्या सूचना दिलेला आहेत. तसेच १ जुन पूर्वी कृषि निविष्ठा विक्रेत्याने कपाशी बियाण्याची विक्री केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. असे आढळून आल्यास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केली तर कपाशीचे उत्पादन मोठया प्रमाणात वाढ होते. असा शेतक-यांचा तर्क आहे.
कापूस उत्पादक पट्टयात मान्सूनपूर्व कापुस लागवड करण्याची प्रथा वाढली आहे. याचा दुष्प्रीणाम म्हणुन गुलाबी बोंडअळीचा प्रकोप् वाढला आहे. सन 2017 मध्ये हा प्रकार प्रकर्षाने दृष्टीस पडला. यावर मात करण्यासाठी सन 2018 ते 2022 या कालावधीत उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. यातुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. गुलाबी बोंड अळीचे चक्र भेदण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशी लागवड थांबविण्याच्या मा. संचालक, (निवगुनि) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्रृ राज्य्, पुणे यांच्या सूचना आहेत. कपाशीची मान्सूनपूर्व लागवड टाळता यावे म्हणून बोंड अळीचा जीवनक्रम भेदण्यासाठी जून नंतरची लागवडच उपयोगी पडणारी आहे. कोषावस्थेत जाणा-या अळीच्या विस्ताराचे चक्र थांबविता येणार आहे. म्हणुन १ जुन पूर्वी कपाशी बियाणांची विक्री करुन नये अशा सुचना जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ कृषि निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
Users Today : 18