महाडीबीटी पोर्टल प्रणाली शेतकऱ्यासाठी उपलब्ध

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि‍.9 :- सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे कळविण्यात येते की, सद्यस्थितीत सोशल मीडिया मार्फत महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडत दिनांक 15.05.2023 पर्यंत असल्याचे तसेच दिनाक 15.05.2023 नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे संदेश/माहिती अज्ञाताने विविध सामाज माध्यमांवर प्रसारित केलेले आहेत.

 

महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल संदर्भात अशाप्रकारचा कोणताही संदेश/माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेली नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. “महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असुन सदर अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांनुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येत आहे.” तरी https://mahadbt.maharashtra.gov.in/ शेतकरी य़ोजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.

0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *