बुलडाणा, : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणीचा कालावधी दि. ४ मे ते २० मे २०२३ पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी हंगाम २०२२-२३चा सातबारा उतारा, पिकपेरा, बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देऊ नये, आधारकार्ड, बँक खाते सुरु असल्याची खात्री करुन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी नोंदणीसाठी १३ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगाव. संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र – साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा केंद्र – सिंदखेडराजा, नांदुरा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा, केंद्र- वाडी या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.
Users Today : 20