बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

Khozmaster
1 Min Read

महेंद्र हिवाळे  / चिखली-वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने बुधवार 10 मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नेत्या मालतीताई निकाळजे,तालुकाध्यक्ष संजय धुरंदर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर, माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे, तालुका सचिव जितेंद्र निकाळजे, महेंद्र हिवाळे उपाध्यक्ष संजय जाधव, तालुका संघटक राजू खंडारे, शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे, विभाग प्रमुख प्रदीप वाकोडे, सदानंद गवई, सय्यद नाशिर ,सय्यद सलमान, अमीर शहा, शेख अनिस, दीपक साबळे, पवन , सय्यद जावेद, अखिल, दादाराव सोनटक्के, अविनाश बोर्डे, समता सैनिक दलाचे एकनाथ बोर्डे, विलास जाधव यांच्यासह डॉक्टर गवई, सामाजिक कार्यकर्ते दयानंद निकाळजे, पत्रकार संजय निकाळजे आदींच्या हस्ते चिखली ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रुग्णालयाचे कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *