मंठा शहरात खुलेआम भेसळयुक्त व कालबाह्य खाद्यपदार्थ विक्री, खाद्यभेसळ विभाग आहे कुठे ?

Khozmaster
2 Min Read

अन्न भेसळ विभागाला लाख रुपये हप्ते जात असल्याची चर्चा

 

गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

मंठा ता.१४ वृत्तसंकलन मंठा शहरातील खेतेश्वर बिकानेर खेळते मानवाच्या जीवाशी, चक्क सहा महिने कालबाह्य झालेले मिल्ककेक ग्राहकाच्या स्वाधीन अनेक वर्तपत्रात बातम्या प्रकाशित होऊनही अन्य व भेसळ विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही खेतेश्वर बिकानेर व अन्नभेसळ विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

शहरामध्ये अल्प अवधीमध्ये नावास उदयास आलेले खाद्य विक्री भंडार चक्क मानवी जीवाशी खेळत असल्याची चित्र आहे कालबाह्य झालेले मिल्क केक ग्राहकांच्या स्वाधीन ग्राहक सुज्ञ नसल्यामुळे त्यानी बिकानेर मालकाला याचा जाब विचारला मात्र बिकानेर मालकांनी नजरतुकींनी झाले असल्याचे सांगितले मात्र हाच मिल्क केक अज्ञान व्यक्तींनी नेऊन लहान मुलांना खाऊ घातले असल्यास मोठा अनर्थ झाला असता मात्र बिकानेर मालकांना याची गंभीर नसल्याची दिसत आहे.

बिकानेर मालकांना मोठमोठ्या राजकीय लोकांचा आश्र असल्याचे दिसत आहे यामुळे कालबाह्य झालेले मिल्की सडलेला केक आळ्या झालेल्या कचोऱ्या ग्राहकांच्या स्वाधीन करून मानवी जीवनाशी खेळण्याचा खेळ मांडला आहे याला कोणाची वचक राहिलेली नाही. सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडत आहे की अन्न भेसळ कायदा अमलात आहे का नाही.

 

काही ग्राहकांना चक्क कचोरी मध्ये चक्क जिवंत आळय निघाल्या व काही ग्राहकाने वाढदिवसाच्या केक खरेदी केला असता केक मधून दुर्गंधी येत होती, दहा दिवसा पूर्व मिल्क केक खरेदी केला तोही सहा महिन्यापूर्वी कालबाह्य झालेला.हे ग्राहकाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकार अघड्या डोळ्यांनी होत आहे. गरम खाद्यपदार्थ जलेबी, ढोकला ,फाफडा, कचोरी समोसा, चक्क शाही असलेल्या पेपर वर दिला जातो,तिच शाही पोटात गेल्यावर कॅन्सर सारखा गंभीर आजार शाहीने होतो हा खेतेश्वर स्वीट मार्ट वाला ग्राहकाच्या जिवाशी खेळत आहे भेसळ प्रतिबंधक घालणार केव्हा की, खाद्य भेसळ विभाग आहे कुठे ? अन्न भेसळ विभागाशी संपर्क साधल्याचा ते कोणतेही पत्रकाराचा फोन उचलत नाही अन्नभेसळ विभागाला लाखो रुपयाचे हप्ते मंठा तालुक्यातील उपगृहपालकाकडून जात असल्याची चर्चा मंठा शहरात आहे.

खाद्य भेसळ विभाग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे या विभागाचे मंठा शहरात वारी होत का नाही हा मोठा? व कोणत्याही उपहारगृहावर याबाबत जी हेल्पलाइन नंबर किंवा कोणतीही कारवाई नाही. अन्य व भेसळ प्रतिबंध विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *