काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विविध पदाधिकारी यांच्या नियुक्ती संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Khozmaster
2 Min Read
  1. 14 मे 2019 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री.आ. नानाभाऊ पटोले यांचे आदेशान्वये मा.श्री श्याम ऊमाळकर व माजी आमदार श्री ॲड. रामहरी रुपनवर यांच्यावर सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या मोहोळ,माढा,मंगळवेढा व सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विविध पदाधिकारी यांच्या नियुक्ती संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे आज सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित तालुक्यातील जुने अध्यक्ष व पदाधिकारी तसेच नवीन अध्यक्ष व पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते आलेल्या सर्व जुन्या नवीन पदाधिकारी अध्यक्ष यांच्या तक्रारी, अडचणी मुख्य समन्वयक श्याम उमाळकर व निरीक्षक रामहरी रुपनवर यांनी सविस्तरपणे ऐकून घेतल्या सदर बैठकीचा समारोप दुपारी 4 वाजता करण्यात आला त्यानंतर श्री श्याम उमाळकर व श्री राम हरी रुपनवर यांनी देशाचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा श्री.सुशील कुमारजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा.श्री धनाजीराव साठे,माढा नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री दादासाहेब साठे,सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सौ.शाहीन अब्दुल रहमान तसेच सांगोला मतदारसंघातील श्री प्रभू चंद्र झपके,सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. अर्जुनराव पाटील, प्रसिद्धी प्रमुख समलिंग शरगर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस NSUI तसेच विविध फ्रंट ल चे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस पंढरपूर,बार्शी व करमाळा या तालुक्यातील पक्षांतर्गत विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.

0 6 2 5 7 0
Users Today : 206
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *