14/वसई
जिजाऊ संघटना महाराष्ट्र संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसई तालुक्यात भामटपाडा, कोपर, उंबरपाडा, समेळपाडा, रानगाव व भुईगाव या शाखा संघटनांचे तसेच रानगाव येथे MPSC/MPSC वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
संस्थापक मा.निलेश भगवान सांबरे यांचे स्वप्न प्रत्यक्षात कृती मध्ये आणण्यासाठी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव सेवा तत्पर जिजाऊ संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य भरात प्रतिसाद मिळत आहे.
पालघर जिल्हातील ग्रामिण व शहरी भागांसह संपूर्ण कोकणात जिजाऊ संघटनेचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात नागरीकांच्या हाकेला धावून जाणारी संघटना म्हणून जिजाऊ संघटनेचा नावलौकिक वाढला आहे संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी जनसेवेचा घेतलेला वसा गोरगरीब जनतेला अतिशय उपयुक्त ठरली आहे.
जिजाऊ संघटनेचे स्वतःचे हॉस्पिटल असुन कॅन्सर, हर्निया, स्टोन अँपेडीज मोतीबिंदु यांसारख्या मोठ्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. तसेच संघटनेचे 8 CBSC स्कुल आहेत. गोरगरीब मुलांना दर्जाहीन शिक्षण मोफत घेता यावे यासाठी 8 CBSC स्कूल मधुन हजारो विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. अंध मतिमंद मुला मुलींसाठी निवासी शाळा,
महिला सक्षमीकरण च्या माध्यमातुन महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले जातात.
जिजाऊ संघटनेच्या माध्यमातु आरोग्य शिबीर ( मोफत चष्मे वाटप औषधे वाटप) रक्तदान शिबीर, आधार कार्ड शिबीर, मोफत आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड शिबीर, मोफत मोतीबिंदु ऑपरेशन शिबीर, दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप ईत्यादि शिबीरे संघटनेचा वतिने मोफत राबवले जातात.
आपल्या मातीतील विद्यार्थी मोठे अधिकारी व्हावेत, यासाठी संपूर्ण कोकणात ( ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) या पाच जिल्हात जिजाऊ संघटनेचे मोफत 43 MPSC/UPSC वाचनालये सुरु असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या वाचनालयांचा लाभ घेत आहेत. आजवर ३०० हून अधिक विद्यार्थी विविध शासकीय पदांवर तसेच ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी हे खाजगी सेवेत रुजू झाले आहेत.
वसई तालुक्यात आरोग्य शिक्षण महिलांचे प्रश्न स्वच्छता विज रस्ते यासारख्या अनेक समस्या तोंड आ करून उभ्या आहेत वर्षानुवर्षे सत्तेत असणारे सत्ताधारी व झोपलेले प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्यांना आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवून अन्याय केला जात आहे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी या शाखा संघटनांचे उद्घाटन करण्यात आले आहे असे प्रतिपादन जिजाऊ कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्रजी ठाकरे यांनी केले.
वसई तालुक्यातील बेनापाडा, उंबरपाडा, कोपर,समेळपाडा, रानगाव, भुईगाव या शाखांचे तसेच रानगाव येथे मोफत MPSC / UPSCवाचनालयाचे उध्दघाटन करण्यात आले
यावेळी जिजाऊ संघटनेचे जी प बांधकाम सभापती संदेश ढोणे, कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्रजी ठाकरे, जिजाऊ संघटनेचे प्रवक्ते सुजाय जाधव, जिजाऊ संघटना बोईसर प्रमुख अझहर शेख, भूमिपुत्र फाउंडेशन सुशांत दादा पाटील, जिजाऊ संस्था वसई तालुका अध्यक्ष हर्षाली खानविलकर, जिजाऊ संघटनेचे दीप्तेश, अमित नाईक व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 27