बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह
जिल्हा सामान्य रुग्णालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करा,आज रोजी *ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन* यांनी जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या मार्फत मा. तुकारामजी मुंढे साहेब रिजनल ऑफिसर(आरोग्य विभाग)पुणे यांना निवेदन देण्यात आले,जिल्हाभरातून विविध समाजाचे गोरगरीब जनता उपचारासाठी तसेच दुर्धर आजाराच्या औषधोपचारासाठी येत असतात,त्यांना योग्य सेवा न पुरविता त्यांचे आरोग्याची खेळणाऱ्या जिल्हा शल्स चिकित्सक व डॉ.भुसारी प्रभारी चिकित्सक यांनी रुग्णलयाच्या कारभारात हस्तक्षेप करून सफाई कामगार भरती मध्ये नियमबाह्य भरत्या करून योग्य उमेदवाराला डालवून भ्रष्टाचार करून लाखो रुपयांचा चुना शासनाच्या तिजोरीला लावला आहे,तसेच विविध यंत्रसामुग्री खरेदी प्रकरणी विविध निविदा काडून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून याप्रकरणी दै. जनसंचलन या वृत्तपत्रानी विरोधी मालिका सुरू केल्या मुळे आरोग्य अकोला मंडळ अकोला यांनी सदरचा भ्रष्टाचार 88 करोड रुपयांचा नसल्याचे म्हटले आहे,डॉ.भुसारी व इतर डॉक्टर सामान्य रुग्णालयात उपचार न करता त्यांना आपल्या खाजगी रुग्णालयात बोलावतात त्याची देखील चौकशी व्हावी यासाठी वृत्तपत्राने आवाज उठविलेला आहे,आपण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उपरोक्त प्रकरणी सेवानिवृत्त न्यायधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून झालेल्या भ्रष्टाचाराची तसेच जिल्हा शल्सचिकित्सक व प्रभारी जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.भुसारी यांची चौकशी करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अस हे वाक्य निवेदन मध्ये नमूद केले,आहेत,व अशी मांगणी ए आय एम आय एम चे जिल्हाध्यक्ष डॉ.मोबिन खान व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी मार्फत मा. तुकारामजी मुंढे साहेब रिजनल ऑफिसर आरोग्य विभाग पुणे यांच्याशी केली,यावेळी AIMIM चे जिल्हाध्यक्ष डॉ.मोबीन खान,जिल्हा महासचिव शेख मुजम्मिल,जिल्हासचिव अकील अहमद,जिल्हा महासचिव हाफिज रहीम,जिल्हासचिव मोहम्मद शिफ़ात,ऑटो यूनियन अध्यक्ष योगेश पांडव,आसिफ खान,व आदि मान्यवर उपस्थित होते,
Users Today : 0