.मेहकर
करघाटबोरी घाटबोरी गट
ग्रामपंचायत असलेल्या नागेशवाडी परिसरातील दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गॅस्ट्रो. डायरिया प्रकरणाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी गंभीर दखल घेतली असून शनिवारी मेहकर ग्रामीण रुग्णालय तसेच जानेफळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे भेट देत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष विचारपूस केली.
सध्या या प्रकरणात एकूण ४४ नागरिक बाधित झाले असून त्यापैकी १८ रुग्ण मेहकर ग्रामीण रुग्णालयात, तर २६ रुग्णांना जानेफळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रुग्णालय भेटीदरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित डॉक्टर व आरोग्य
अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रुग्णांना उपचारादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का, तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का याची माहिती घेतली. नागरिकांच्या उपचारात कोणतीही हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना द
Users Today : 29