खामगाव
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी खामगाव येथे गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर शनिवारी मागे घेण्यात आले. राज्याचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याने आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी ना. आकाशदादा फुंडकर यांनी नगरपरिषद जवळील नाट्यगृहाच्या दक्षिण दिशेला, नगरपरिषदेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वार व सांस्कृतिक भवन यांच्या मधील मुख्य रस्त्यालगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच संबंधित प्रस्तावाची आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पुरी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सुनील पाटील, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पवार, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके तसेच कार्यकारी अभियंता तळीले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 29