वडनेर येथील मातंग समाजातील 25 वर्षीय महिलेस घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तसेच अश्लील शिवीगाळ व मारहाण

Khozmaster
1 Min Read

नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) : वडनेर येथील मातंग समाजातील पंचवीस वर्षीय महिलेस तिच्या राहत्या घरी वडनेर येथील इसमाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला महिलेने विरोध केल्याने महिलेस अश्लील शिवीगाळ करून तसेच जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली आणि सदर घटना तू कोणाला सांगितले तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी देण्यात आली यावेळी संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने नांदुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अनिल बेराणी साहेब यांना तक्रार अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये घटनास्थळ घडलेली घटना आदी बाबींचा समावेश आहे तसेच मातंग समाजातील महिलेवर अन्याय करणाऱ्या इसमाविरुद्ध योग्य कारवाई करून महिलेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रार अर्जामध्ये केलेली आहे.

सदर अर्ज सादर करते वेळी शिवाजी गजानन चंदनशिव, उमा बोचरे (पत्रकार), राष्ट्रीय लहू शक्तीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय पारेकर, मातंग समाजाचे युवा नेते महेंद्र वानखडे, श्रीकृष्ण वानखडे, सुरेश सोनवणे, सुरेश वानखडे, रमेश वानखडे, शिवम मानकर, गजानन सकळकर आणि असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *