अबब… हे काय ? रेतीमाफियाची तहसीलदार यांना जीवे मारण्याची धमकी..!

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकर

जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

मंठा-तालूक्यातील उस्वद रेती घाटावर पहाणी करण्याकरीता तसेच अवैधरीत्या होत असलेल्या रेती उत्तखनन व रेती वाहतूकीला पायबंध घालण्यासाठी जात असलेले मंठा तहसीलदार कैलासचंन्द्र वाघमारे यांना रेती माफीया यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.१९ मे रोजी महादेव मंदिराच्या पाठीमागे हनवतखेडा रोडवरील पुलाजवळ उस्वद येथे घडल्याने एकच खळबळ उडाली.या प्रकरणी रेती माफीयावर विवीध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की उस्वद रेतीघाटाची पहाणी करण्याकरीता तहसीलदार जात आसताना महादेव मंदीराच्या पाठीमागे हनवतखेडा पुलाजवळ ४ रेती वाहने चोरटी रेती वाहतूक करीत आसल्याचे तहसीलदार कैलासचंन्द्र वाघमारे यांच्या निर्देशणास आले .त्यांनी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला आसता ३ वाहने भरघाव वेगाने पसार झालेत. ६ ब्रास रेती चोरुन १८ हजार रुपायाचे शासनाचे नूकसान झाले आहे,एका वाहनाच्या चालकास विचारपूस करीत असताना आरोपी राजेश सरोदे ,सचीन राऊत व यूवराज ढवळे रा.उस्वद ता.मंठा यांनी शासकीय कामात अडथाळा निर्माण करीत .तहसीलदार वाघमारे यांना धमकुन वाहने अंगावर घालून चिरडूण टाकण्याची भाषा वाफरली. फिर्यादी तहसीलदार कैलासचंन्द्र वाघमारे यांच्या फिर्यादी वरुन मंठा पोलीस स्टेशण मध्ये आरोपी राजेश सरोदे ,सचीन राऊत व यूवराज ढवळे यांच्यवर शासकीय कामात अडथाळा आणने कलम ३५३ ,३७९,२७९ भादवी सहकलम ३ व ४,खनीज कायदा १८४ मोवाका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.पूढील तपास पोलीस उपनीरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

नवीन धोरणानुसार रेती घाटाचे लिलाव नाहीत तर दूसरीकडे दिवसाढवळ्या रेतीघाटातून चोरी होत आहे.अशातच शासकिय अधीकारी यांना जिवे मारण्याच्या धमक्या रेती माफीया देत असल्याने निर्देशणास येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *