महाराणा प्रताप यांच्या ४८३ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

कार्यालय प्रतिनिधी

निगडी २१ – भारताचे राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची ४८३ वी जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणी राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने महाराणा प्रताप उद्यान निगडी येथे २२ मे सकाळी १०:०० वाजता विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरी होणार आहे.

सकाळी ७ वाजता उद्यानातील पुतळ्याचे मंत्रोच्चारात जलाभिषेक तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते महाआरती होणार आहे.

जयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणी वकृत्व स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह,मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणी समाजातील विविध स्तरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होणार आहे तसेच महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेला उपयुक्त साहित्य राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड या संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे.

महाराणा प्रताप यांची जन्मभूमी कुंम्भलगड व शौर्यभूमी हल्दीघाटी येथील पवित्र माती मंगल कलशाचे पुजन करून त्यांचे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील राजपूत समाज बांधवांच्या प्रमुख प्रतिनिधींना वाटप करण्यात येणार आहे.

याशिवाय रक्तदान शिबीर,पर्यावरण संवर्धनासाठी ४८३ झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

पृथ्वीराज थियटर्स प्रस्तुत सतिश इंगळे,वंडरबाॅय पृथ्वीराज इंगळे यांच्या टिमचे वीर सर देशभक्ती व भक्ती गीतांचे बहारदार संगिताचा कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे

महाराणा प्रताप जयंती कार्यक्रमाला महासंसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेशदादा लांडगे,आमदार अश्विनी जगताप, उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव,अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ,माजी सचिव जलसंपदा महाराष्ट्र विलास राजपूत,माजी महापौर कविचंद भाट,माजी महापौर वैशाली घोडेकर,माजी महापौर नितीन काळजे,माजी महापौर उषा माई ढोरे,माजी उपमहापौर शैलजाताई मोरे,मनसे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले,श्रीमती सुमनताई पवळे,कमलताई घोलप,प्रा.उत्तम केंदळे, नितीन चिलवंत,सुरेश तळेकर,राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवकुमारसिंह बैस,सौ.अश्विनी राजपूत सचिव राणा अशोक इंगळे,उपाध्यक्ष सुरेश सुर्यवंशी,सोशल मीडिया प्रमुख गणेश राजपूत,पिंपरी चिंचवड रूग्णसेवक संघटना अध्यक्ष संदीप चव्हाण सह महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार प्राप्त अरूण पवार,महाराष्ट्र शासन कामगार भुषण पुरस्कार विजेते डॉ.मोहनराव गायकवाड,सर्पमित्र श्रीराम रसाळ,विजय राजपूत,कैलाशसिंह चौहान, किरण परदेशी, अशोकसिंह परदेशी,नारायण चंदेल,श्रीराम परदेशी,ॲड, तृप्ती परदेशी,प्रविण राजपूत,गणेश राजपूत,राजकुमार परदेशी,महेंद्र गिरासे,राणा मुकेश राजपूत,जितेंद्र पाटील,सागरसिंह बघेल सह आदी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *