
*आकोट शहरातील न पा च्या घरकुल्याच्या टप्पानिधी मीळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधीकारी यांनी न पा प्रशासनाला धरले धार्यावर*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
अकोट शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थांचे प्रलंबित असलेले निधीचे उर्वरित टप्पे लवकरात लवकर मिळावे या अनुषंगाने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असताना २०२२ पर्यंत सर्व पात्र कुटुंबांना पक्के घर सुनिश्चित करून भारतातील शहरी भागातील घरांची कमतरता दूर करणे हे पीएमएवाय अर्बन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.एकूणच,पीएमएवाय-यू मिशन अंतर्गत २० दशलक्ष घरे बांधण्याची सरकारची योजना आहे.परंतु आता सन २०२३ हे वर्ष सुरू झाले असून देखील अकोट शहरातील जवळपास 230 घरकुल लाभार्थांना सदर योजनेतील निधीचे उर्वरित टप्पे गेली सहा महिन्यापासुन मिळालेले नाहीत.
शहरातील लोकप्रतिनिधी यांचा प्रशासनावर वचक नसल्याने सदर प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.उन्हाळा संपत आला असून आता पावसाळा सुरू होत आहे.योजनेतील लाभार्थ्यांना राहायला स्वतः चे घर नाही त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहत आहेत आता प्रशासनाने व लोकप्रतिनी यांनी विचार करण्याची वेळ आली आहे की त्या लोकांनी किती दिवस भाड्याने राहायचे ? सदर प्रकार जवळपास एक वर्षापासुन सुरू असून न.पा.प्रशासन जाणीवपूर्वक झोपीच सोंग घेत असल्याचा सुर स्थानिक नागरिकांत उमटत आहे.घरकुल या विषयी शिवसेनेने सुरवातीपासुन जनतेच्या पाठीशी उभं राहुन त्यांच्या याबाबतीत असलेल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहून आपली प्रामाणिक भूमिका बजावली आहे.याआधी देखील शिवसेनेने याबाबत अनेक वेळा आवाज उठवुन असंख्य घरकुल लाभार्थांना न्याय मिळवून दिला आहे तरी प्रशासनाने याबाबत योग्य पाउल उचलुन लाभार्थांना लवकरात लवकर उर्वरित निधीचे टप्पे मिळावे यासाठी अंमलबजावणी करावी अन्यथा अकोट शहर शिवसेनेच्या वतीने मागन्या पूर्ण न झाल्यास नगरपालिका .आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदना तुन शिवसेना न.प.गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने न.प. मुख्याधिकारी यांना देण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी यांनी सदर काम तिन दिवसात सुरू करतो.असे आश्वासन देण्यात आले

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे विक्रम जायले विधान सभा संघटक अमोल पालेकर मनोज खंडारे शिवसेना अकोट शहर प्रमुख तालुका संघटक रोशन पर्वतकार सुनिल रंदे शहर संघटक विजय ढेपे माजी
उपशहर प्रमुख गणेशराव कुलट प्रथमेश बोरोडे सौरभ बोरोडे मुकेश ठोकळ नंदु कुलट अजय सावरकर शुभम परीयाल सागर कराळे नयन कराळे दिपक रेखाते मुकेश ठोकळ असंख्य शिवसैनिक उपस्थित होते
Users Today : 15