
*मुंडगाव ग्रामपंचायत तर्फे अहिल्याबाई होलकर पुरस्कार वितरण*
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
शासनाने नव्याने प्रत्येक गावातील दोन कार्यशील महिलेला अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे असा प्रशासकीय आदेश पारित केला होता यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागवण्यात आले होते त्या अनुषंगाने मुंडगाव ग्रामपंचायत येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय मुंडगाव येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त करण्यात आले होते त्यामध्ये सुनंदा काशीराम साबळे व पूजा आकाश काळे यांना पुरस्कार वितरण करण्यात आला पुरस्कारामध्ये पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले या वेळी मुंडगाव
ग्रामपंचायतचे सरपंच मीना उईके. उपसरपंच तुषार पाचकोर.पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात. ग्रामविकास अधिकारी गणेश जाधव. ग्रामपंचायत सदस्य अरविंद फुशे. जुगल किशोर चिंचोलकर भास्कर पोहरकर. इम्रान खान. भगवान गावंडे. सुरेश गवई. नितीन गाडगे विलास ठाकरे. श्रद्धा ताई पाचकोर. आरती गवई. अजीज अहेमद. अनिल गाढे. दीपक मुंडोकार. भीमराव सरकटे. व गावातील नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
Users Today : 11