खाजगी मोजणीचा सुळसुळाट.. महसूल, पोलीस विभागाचे दुर्लक्ष..

Khozmaster
1 Min Read

मान्सून चा आगमन आणि मशागतीला सुरुवात झाली. परंतु हे सगळे होत असताना महत्वाचे ठरते शेतीची अधिकृत मोजणी.

मेहकर तालुक्यात बनावट मोजणी चा सुळसुळाट सुरु आहे.

कोणतेही पात्र शिक्षण, प्रमाणित साहित्य, नसताना दहावी फेल लोक या क्षेत्रात मोजणीचा गोरखधंदा करीत आहेत. शेतीच्या वादात गंभीर गुन्हे तसेच सांप्रदायिक तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेच प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. केवळ सॉफ्टवेअरच्या भरोशावर मोजणी करत असलेल्या अशा मेहकर तालुक्यातील खाजगी मोजणी धारकांना महसूल तसेच पोलीस विभागाचा कोणताही धाक दिसून येत नाही. शेतकऱ्याकडून अवाजवी दर आकारण्यात येतो. वेळेचा अभाव असल्यामुळे शेतकरी बांधव मोजणी धारकाची पात्रता न पाहता आपल्या शेतीच्या मोजणी भराभर करून घेत आहेत. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. महसूल विभागासाठी विभाग चिंताजनक असून उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्याभरात सुरू असलेल्या बोगस खाजगी मोजणींना थांबून अशा प्रकारच्या लोकांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *