अकोट ग्रामीण पोलिसांची प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर कारवाई*!

Khozmaster
1 Min Read

*अकोट ग्रामीण पोलिसांची प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर कारवाई*!

 

*अकोट प्रतिनिधी विशाल गवई

 

अकोट‌ ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुनर्वसीत गांव धारगड येथील अरुण करनसिंह बेठेकर रा धारगड व मोहाळा येथील जमीर बेग मुश्ताक बेग यांना सुगंधित पान मसाला व गुटखा विक्री करीत असल्याच्या माहिती वरून अकोट ग्रामीण पोलिस‌ गस्तीवर असताना कारवाई केली असता वरील नमूद आरोपी मिळवून आले तसेच घरांची पंचासमक्ष झडती घेतली असता

त्याचे घरामधे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा असा 26,280/रू चा मुद्देमाल मिळालेवरून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी 1) अरूण करणसिंग बेठेकर, वय 42 वर्ष, रा. धारगढ व 2) जमीर बेग मुश्ताक बेग, वय 32 वर्ष, रा. मोहाळा ह्यांना अकोट ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

सदरची कार्यवाही मा. गोकुळ राज, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, नितीन देशमुख, पोलीस निरिक्षक अकोट ग्रामीण ह्यांचे मार्गदर्शनात पो उपनिरीक्षक विजय पंचबुधे शैलेश जाधव गोपाल जाधव सचिन कुलट पुजा वानखडे, यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे करीत आहेत.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *